बंडखोर पंडिता (भाग १)
पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी …